याआधी त्यांनी हुजूर पक्षाच्या संसदीय गटनेते पदाचा राजीनामा दिला होता.
नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून मागील 24 तासात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर आहे. ऋषी सुनक हे भारतीय उद्योजक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.