11.4 C
New York
Tuesday, November 5, 2024

Buy now

spot_img
spot_img
spot_img

निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा – विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. सध्या काही दिवसात महाराष्ट्रातील निवडणूकीची घोषणा करण्यासाठी आयोग सज्ज होत आहे.

महाराष्ट्रासह झारखंड राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आयोगाच्या दौऱ्याबाबत माहिती पुढे आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोग पहिल्यांदा झारखंडचा दौरा करणार आहे. राजीव कुमार आणि इतर निवडणूक आयुक्त 23 आणि 24 सप्टेंबर रोजी झारखंडमध्ये उपस्थित राहतील.

झारखंड दौऱ्यानंतर आयोग 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात दाखल होईल. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यापूर्वी आयोग संबंधित राज्यांचा दौरा करतो. त्यामुळे या दोन्ही राज्यांसाठी या दौऱ्यांचे महत्त्व अधिक आहे.

2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. मात्र, यावेळी निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुका एकाच वेळेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील निवडणुकीत महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका वेगवेगळ्या कालावधीत पार पडल्या होत्या, मात्र यावेळी त्या एकाच वेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येत आहे, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी समाप्त होणार आहे. त्यामुळे लवकरच या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुक जाहीर होईल.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles