महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला शनिवारी (दि. 21) सुरुवात झाली. रविवारी (दि.22) दोन सत्रात संघांचे सादरीकरण होणार असून त्यानंतर पुरुषोत्तम करंडकावर कोण नाव कोरतो ते स्पष्ट होणार आहे. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून पारितोषिक वितरण ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे.