2.5 C
New York
Sunday, February 16, 2025

Buy now

spot_img
spot_img
spot_img

पिंपरी ते स्वारगेट मेट्रो प्रवास लवकरच सुरू होणार आहे, तीन मेट्रो स्थानकांची कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.

पिंपरी ते स्वारगेट मेट्रो प्रवास लवकरच सुरू होणार आहे, तीन मेट्रो स्थानकांची कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत.

पीसीएमसी ते स्वारगेट (17.4 किमी) या मार्गावर 14 स्थानके आहेत. तर वनाझ ते रामवाडी (15.7 किमी) या मार्गावर 16 स्थानके आहेत. 6 मार्च 2022 रोजी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्यात पीसीएमसी ते फुगेवाडी (7 किमी, 5 स्थानके) आणि वनाझ ते गरवारे (5 किमी, 5 स्थानके) असे एकूण 12 किमी अंतरावरील 10 स्थानकांदरम्यान मेट्रो सुरू(Pune Metro) झाली.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पर्पल मार्गिकेवरील (लाईन 1) कसबापेठ (बुधवार पेठ), मंडई, स्वारगेट या तीन भूमिगत स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता महा मेट्रो कडून उद्घाटनाचा मुहूर्त शोधला जाणार(Pune Metro) आहे.

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles