खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गोंधळ आता शिखरावर पोहचला आहे. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती यांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत विरोधकांनी मोहिते पाटलांचे दोन संचालक फोडण्याचा धाडसी प्रयत्न केला. कुटपद्धतीने त्यांनी सत्ता काबीज करण्याचा खटाटोप केला, पण आमदार मोहिते यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा वापर करून या खेळीला यथास्थानी उत्तर दिले.
आमदार मोहिते यांच्या तात्काळ हालचालींमुळे निवडणुक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्यावरच रद्द करण्यात आल्या. विरोधकांच्या गडबडीतून सावरत मोहिते पाटलांनी आपले गड मजबूत केले.
या घटनाक्रमातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, दिलीप मोहितेंचा राजकीय पवित्रा केवळ स्थानिक स्तरावरच नाही, तर संपूर्ण तालुक्यात एक सशक्त प्रभाव निर्माण करतो. त्यांनी नकळतपणे विरोधकांना संदेश दिला , सत्ता मिळवण्यासाठी खालच्या पातळीवर जात असलेल्या खेळाला ठेचून काढले जाईल.