पहिल्या डावातील ढिसाळ कामगिरीमुळे अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात जबरदस्त पुनरागमन केले आहे. मुंबईकर सर्फराज खानने साउदीच्या गोलंदाजीवर खणखणीत चौकार मारत बंगळुरुच्या मैदानावर आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. भारतीय संघाला अडचणीतून बाहेर आणण्यात त्याचे योगदान महत्वाचे ठरले.
सर्फराजने ११० चेंडूत शतक पूर्ण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचे ओझे उचलणाऱ्या या मुंबईकराने टीम इंडियात मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे. चौथ्या सामन्यात चौथ्या अर्धशतकाला शतकात बदलण्यात त्याला यश मिळाले.
सर्फराज खान हा थांबणारा फलंदाज नाही; एकदा त्याला लय लागली की तो २०० किंवा ३०० धावांचा आकडा गाठू शकतो, हे त्याने क्रिकेटमध्ये अनेकवेळा सिद्ध केले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, खासकरून इराणी चषकात त्याने द्विशतकी खेळी केली होती.