इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. वर्ल्ड कपआधी टी20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड पाकिस्तानात पोहोचली आहे. पण पाकिस्तानात पोहोचताच इंग्लंड संघव्यवस्थापन चिंतेत सापडलं आहे.
कारण पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या दुखापतीनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या दृष्टीनं विचार करता बटलर संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. बटरलच्या दुखापतीकडे बारीक लक्ष वर्ल्ड कपसारख्या मेगा इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर बटलरची दुखापत इंग्लंडचं टेन्शन वाढवणारी आहे. त्यासाठी ईसीबीची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहे.
पोटरीच्या दुखापतीमुळे बटलर पहिले काही सामने खेळणार नाही एवढं नक्की आहे. वैद्यकीय टीमकडून त्याला काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर बटलरची दुखापत वेळेत बरी झाली तर अखेरच्या दोन सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. मोईन अली कर्णधार बटलरला विश्रांती दिल्यानं ऑफ स्पिनर मोईनं अली इंग्लंड संघाचं नेतृत्व करेल.
दरम्यान पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंडचा संघ 7 टी20 सामने खेळणार आहे. 20 सप्टेंबरला कराचीत पहिला सामना खेळवला जाईल. तर 2 ऑक्टोबरला अखेरचा टी20 सामना पार पडेल. त्यानंतर दोन्ही संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.
17 वर्षांनी इंग्लंड पाकिस्तानमध्ये महत्वाची बाब म्हणजे इंग्लंडची टीम गेल्या 17 वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानात पोहोचली आहे. 2005 साली इंग्लंड संघानं अखेरचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी गुरुवारी इंग्लंडचा संघ पाकिस्तानात पोहोचला. 2005 साली इंग्लंडचा संघ पाकिस्तानात आला होता तेव्हा 3 कसोटी आणि पाच वन डे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली होती. पण इंग्लंडला कसोटीत 0-2 आणि वन डेत 2-3 अशी हार स्वीकारावी लागली होती. हेही IPL 2023: पंजाबचे ‘किंग्स’ 15 वर्षांनी आयपीएल ट्रॉफी जिंकणार? विश्वविजेते ‘कोच’ पंजाबच्या ताफ्यात सामीलइंग्लंडचा संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली (उपकर्णधार), हॅरी ब्रुक, सॅम करन, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, अॅलेक्स हेल्स, रिचर्ड ग्लेसन, टॉम हेल्म, विल जॅक्स, डेविड मलान, आदिल राशिद, फिल सॉल्ट, ओली स्टोन, रीस टॉपली, डेविड विली, ख्रिस वोक्स, लुक वूड आणि मार्क वूड