कृषिमंत्री धनंजय मुंडे बुधवारी, २५ तारखेला खेड तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन स्थानिक नागरिकांसोबत जनसंवाद साधणार आहेत. या दौऱ्यात त्यांची प्रमुख उपस्थिती आमदार दिलीप मोहिते यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या ४२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात राहणार आहे. ‘भेट माझ्या तालुक्याची… भेट कुटुंब संवादाची’ या उपक्रमाच्या अंतर्गत आमदार मोहिते हे तालुक्यातील विविध गावांमध्ये नागरिकांशी संवाद साधत आहेत, आणि यावेळी कृषिमंत्री मुंडेही त्यांच्यासोबत असतील.
वेताळे, चांडोली, गोलेगाव आणि मरकळ या ठिकाणी विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. सकाळी ११ वाजता १७.५ कोटी रुपयांच्या वेताळे ते कान्हेवाडी भीमा नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन होईल. दुपारी १२:३० वाजता चांडोली येथे १५ कोटी रुपयांच्या कृषीभवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. गोलेगाव येथे ४ वाजता १० कोटी रुपयांच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन तर संध्याकाळी ६ वाजता मरकळ येथे जाहीर सभेचा कार्यक्रम होणार आहे.